fbpx
Select Page

नमस्कार, गुरुवर्य 🙏

आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी आपल्यासमोर मी एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन पत्र लिहीत आहे. तो म्हणजे ‘शिक्षकांची कृतज्ञता.’

तुम्ही माझ्या जीवनातील असे मार्गदर्शक आहात, तुम्ही माझ्या संपर्कात आल्यानंतर मी तुमच्याकडून प्रत्येक मेसेज व फोन कॉल्स तसेच कोर्स मध्ये दिलेल्या प्रतिक्रियांमधून भरपूर काही शिकत असतो. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी मार्गदर्शक आहात. तुमच्या मार्गदर्शनाने मी जीवनातील सर्व आव्हानांचा सामना करण्यास सक्षम झालो आहे. आजच्या या शिक्षक दिनाच्या सुवर्णसंधीतून, मला तुमच्या प्रती व्यक्त होणाऱ्या कृतज्ञतेची भावना आपल्या समोर मांडत आहे. शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात, पण तरीही हा एक प्रयत्न आहे, कृतज्ञतेच्या या मोजक्या शब्दांत त्यांचे आभार मानण्याचा.

मार्गदर्शक/शिक्षक ही एक अशी ज्योत आहे, जी नेहमीच ज्ञानाचा प्रकाश देत असते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर, तुमच्या सारख्या शिक्षकांनी मला योग्य दिशा दाखवली आहे. तुमच्यामुळेच कठोर परिश्रमातून, माझ्या जीवनाचे शिल्प घडले आहे.

“गुरु हेच ईश्वर, गुरुचं ते ज्ञान,
गुरुंच्या कृपेने, होतं जीवन महान।”

हे चार शब्द किती साधे आहेत, पण त्यांच्यामध्ये असलेला अर्थ किती खोल आहे, हे मी जाणतो. शिक्षकांचे महत्व हे शब्दांमध्ये मांडणे अशक्य आहे, पण तुमच्या कृतींनी मला नेहमीच प्रेरित केले आहे.

शिक्षक हे नेहमीच निस्वार्थ भावनेने कार्य करतात. त्यांनी आपल्याला शिकवताना कधीच कष्टाची पर्वा केली नाही. त्यांच्या मनात फक्त एकच इच्छा असते, की आपण यशस्वी व्हावं.

गुरुजी तुम्ही नसता तर शिकलो, चौकोन आणि काटकोन|
तुमच्यामुळेच मिळाला आमच्या, जीवनाला नवा दृष्टिकोण..!

तुम्हीच देतात विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार
म्हणूनच तर होतात आमची ध्येय साकार..!

“कष्ट करी शिक्षक, हसरा चेहरा घेऊन,
विद्यार्थ्यांसाठी सदा, देई ज्ञानाचा वसा घेऊन।”

या ओळींमध्ये तुमच्या निस्वार्थ सेवेला अभिवादन आहे. तुम्ही आपल्यासाठी केलेल्या त्यागाचा आम्ही आदर करायलाच हवा. शिक्षक म्हणजे ज्ञानाचे दीपस्तंभ, तुमच्या प्रकाशाने विद्यार्थी आपल्या भविष्याचा मार्ग शोधतात. तुम्ही पुस्तकातील माहितीची शिकवण देताना जीवनातील मूलभूत मूल्यांची पेरणी केली. “ज्ञान दिलासा आभाळासी, तूच सांगतोस अमृतासी” अशा कवितेच्या ओळींनी त्यांच्या शिक्षणाची, ज्ञानदानाची महती व्यक्त करावी वाटते. त्यांच्या ज्ञानदानामुळे आपण आयुष्यातील अनेक अडचणींवर मात करू शकतो.

शिक्षक हे जीवनाचे खरे मार्गदर्शक आहेत. तुम्ही आम्हाला फक्त पुस्तकांतील ज्ञानच दिले नाही, तर जीवनात कसे पुढे जायचे, हेही शिकवले आहे. शिक्षक हे खरे जीवनाचे गुरूकिल्ली असतात. ते विद्यार्थ्यांच्या मनातील असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधून देतात. तुमच्या ज्ञानामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व फुलते. “गुरु ब्रह्मा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरः” हे वाक्य तुमच्या महानतेचे साक्ष देतं.

“जीवनाची शाळा, गुरुंच्या शिकवणीने उजळली,
दिशा दाखवली, अन् स्वप्ने सजवली।”

आमच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी, तुम्ही मला नेहमी प्रेरित केले. तुमच्या शिकवणीनेच मी माझ्या इच्छित स्वप्न पूर्ण करत आहे.

शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना असे म्हणावेसे वाटते की, “शब्द फुलांचे गंध सुवासिक, कृतज्ञता व्यक्त करीन मी शिक्षकांशी प्रगाढ”. तुमच्या अविरत परिश्रमामुळेच आम्हाला उज्ज्वल भविष्याच्या दिशेने पावलं टाकता येतात. तुमच्या शिकवणीमुळे आम्ही नवा आशावाद अंगीकारतो, जीवनातील ध्येय साध्य करतो. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना, मला तुमच्या प्रती असलेली माझी जबाबदारी समजली आहे. तुम्ही मला ज्या प्रकारे घडवले आहे, त्याबद्दल तुमचे आभार मानले पाहिजेत.

“कृपादृष्टी गुरूंची, अमुच्या जीवनावर असावी,
प्रत्येक चरणावर, त्यांची कृपा दिसावी।”

आपल्या जीवनातील प्रत्येक यशाचे श्रेय शिक्षकांना द्यायला हवे. त्यांच्या कृपादृष्टीनेच आपला जीवनाचा प्रवास सुकर झाला आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मन हे प्रेम, आदर आणि शिस्त या गुणांनी सुशोभित होतं. ते आपल्याला अनुशासन शिकविण्यासाठी कठोर परिश्रम करतात. त्यांच्या शिकवणुकीतून मिळणारं शहाणपण त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचं प्रतिक आहे. त्यांच्या शिकवणुकीमुळे, “दिशा मिळाली जीवनाला, सुरुवात झाली नव्याने” अशी अनुभूती येते.

गुरुवंदन करतो मी, मन करून नतमस्तक,
ज्ञानदाता तुम्ही माझे, मार्गदर्शकही तुम्ही माझे.
तुमच्या कृपेनेच मी झालो आज उज्ज्वल,
तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत सदाच राहतील.

तुम्ही माझ्या जीवनातील देवदूतच आहात. तुमच्या मुळेच माझे जीवन घडले आहे, म्हणूनच मी तुम्हाला आदराने वंदन करायला हवे.

“गुरुंचे स्मरण करु,
जीवन फुलवू सदा,
त्यांच्या शिकवणीतून,
यशाचा आनंद घेऊ सदा।”

शिक्षकांच्या आदरार्थ आपण नेहमी त्यांचे स्मरण करायला हवे. त्यांच्या शिकवणीनेच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो.

शिक्षकांना काय देऊ शकतो?
आपण शिक्षकांना काय देऊ शकतो हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात येतोच. आपण शिक्षकांना आपले प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करून त्यांना खूश करू शकतो. आपण शिक्षकांना चांगले विद्यार्थी बनून त्यांच्या गौरवाचा विषय बनवू शकतो. आपण शिक्षकांना सतत प्रेरणा देऊन त्यांना उत्साहित करू शकतो. म्हणूनच आज मी तुम्हाला माझ्या कार्याचा आढावा घ्यावा अशी विनंती करतो. आढावा घेतल्यावर तुम्हाला माझा नक्कीच अभिमान वाटेल. आणि तुमची मान गौरवाने उंचवेल असे कार्य मी केले आहे. आणि हेच कार्य आणखी मोठ्या उंचीवर घेऊन जाण्यात यश मिळवत आहे. शाबास गुरुजी एज्युकेशन नावाने माझे कार्य लाखों शिक्षकांना डिजिटल शिक्षक बनविण्याची प्रेरणा देत आहे. आज या संस्थेचा वर्धापन दिन सुद्धा आहे. मी स्वत: काही राज्यस्तरीय पुरस्कार तर मिळविलेच पण माझ्या मार्गदर्शनाने बऱ्याच शिक्षकांना सुद्धा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक या सारखे विविध पुरस्कार मिळाले आहेत. काही मोजक्या प्रशिक्षणार्थीसोबत 5 वर्षापूर्वी सुरु झालेले हे कार्य आज 2 लाखाहून अधिक प्रशिक्षणार्थींचे शिक्षणाचे आवडते केंद्रबिंदू बनले आहे. शाबास गुरुजी एज्युकेशनच्या कार्याची संपूर्ण माहिती पाहण्याची तुम्हाला मी विनंती करतो.

उपसंहार:
तुमच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात जेवढे शब्द खर्ची पडतील तेवढे कमीच आहेत. तुम्ही मला प्रत्येक पावलावर आम्हाला आधार दिला, आमच्या स्वप्नांना पंख दिले. शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही आमच्यावर केलेल्या कार्याचे ऋण कधीच फेडता येणार नाही. तुमच्या मार्गदर्शनात जीवनाचा अर्थ समजतो आणि जीवनाला दिशा मिळाली. म्हणूनच, “तुमचे आशीर्वाद, सदैव चिरंतन असावे सोबती” या शब्दांनी मी माझे दोन शब्द संपवितो. तुमचे आभार मानण्याचे हा एक छोटेसा प्रयत्न केला आहे, कारण तुम्हीच आमच्या जीवनाचे खरे शिल्पकार आहेत.

माझ्या परिचित व अपरिचित सर्व मार्गदर्शकांना, शिक्षकांना अभिवादन करीत, मी आजच्या या कृतज्ञतेचा समारोप करतो. तुमच्या शिकवणीने माझ्या जीवनात योग्य दिशा मिळाली आहे. तुमच्या निस्वार्थ सेवेला मी सदैव कृतज्ञ राहून, आणि तुमची शिकवण माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल. तुम्ही हे शेवटपर्यंत वाचले त्याबद्दल तुमच्या चरणी हे कृतज्ञता पुष्प अर्पण करतो.

“शिक्षक हा देव,
शिक्षक हीच ती कृपा,
शिक्षकांची सेवा,
माझ्यासाठी ज्ञानाचा अखंड मेवा।”

धन्यवाद!

तुमचा विद्यार्थी 
श्री. सुभाष बडे
www.ShabasGuruji.com