fbpx
Select Page

शबास गुरुजी प्लॅटफॉर्मच्या प्रशिक्षणार्थ्यांची गगन भरारी

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा आयोजित राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 (निकाल 25 सप्टेंबर 2024) मध्ये विजयी झालेल्या प्रशिक्षणार्थींचे हार्दिक अभिनंदन! 🎉🎊

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा आयोजित
११ कोटींचे बक्षिसे असणारी सर्वात मोठी शासकीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा मे 2023 मध्ये आयोजित केली होती. शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी; यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक-प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तरिय दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीचे खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी शाबास गुरूजी एज्युकेशन पुणे द्वारा जनजागृती व विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना मोठ्या प्रमाणात यश मिळाले. जवळपास 90% हून अधिक प्रशिक्षणार्थी २ पेक्षा अधिक बक्षीसे मिळून विजयी झाले.

💠 विजयी झालेले एकूण प्रशिक्षणार्थी 270 
💠 त्यांना मिळालेली एकूण बक्षिसे 567 

बक्षिसांची संख्या वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणारे प्रशिक्षणार्थी
🔘 श्रीमती करुणा गुरव मॅडम 34 बक्षिसे मिळविली
🔘 श्री. अशपाक शेख सर यांनी 24 बक्षिसे मिळवली

🔲 राज्यस्तरीय एकूण 6 विजेते ठरले
1) श्री विजय वनवे सर – राज्यस्तरीय प्रथम क्रमांक
2) श्री दुर्योधन जठार सर – राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक
3) श्री विवेकानंद ढाकणे सर – राज्यस्तरीय तृतीय क्रमांक
4) श्री प्रकाश सुर्वे सर – राज्यस्तरीय तृतीय क्रमांक
5) श्रीमती सुषमा मांजरेकर मॅडम – राज्यस्तरीय तृतीय क्रमांक
6) श्रीमती गौरी गायवान मॅडम – राज्यस्तरीय तृतीय क्रमांक

सविस्तर निकाल यादी पहा 

शाबास गुरुजींचे प्रशिक्षणार्थी
राज्य स्तरावरील निकाल
जिल्हा स्तरावरील निकाल
तालुका स्तरावरील निकाल

_____________________________

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा आयोजित राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील विजेत्यांचा कौतुक सोहळा व शासकीय राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवण्यासाठी मार्गदर्शन

प्रमुख अतिथी:
१) डॉ. नेहा बेलसरे मॅडम (निवृत्त उपसंचालक)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे

२) श्री. वाटेकर सर
(प्राचार्य: जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे)

प्रमुख मार्गदर्शक :
१) श्री. संदीप वारगे सर
शासकीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त (रायगड जिल्हा परिषद शाळा हटाळे)

२) श्री. संपत गर्जे सर
शासकीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त (भारतीय जैन संघटना संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर पिंपरी पुणे)

३) सौ. सुषमा मांजरेकर मॅडम
शासकीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त (विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस, तालुका-सावंतवाडी, जिल्हा-सिंधुदुर्ग)

४) श्री. रवींद्र केदार सर*
स्मार्ट ग्लोबल क्लासरूमचे प्रणेते (विद्यामंदिर यादववाडी, कोल्हापूर)

दिनांक: 23 ऑक्टोबर 2024
वेळ: रात्री ठीक 8:00 – 9:30 वाजता
स्थळ: ऑनलाइन झूम मीटिंग
Zoom Live लिंक मिळविण्यासाठी येथे क्लिक करावे👇🏻
WhatApp Channel

______________________________

या स्पर्धेची विभागणी खालील प्रमाणे होती
व्हिडिओ निर्मिती स्पर्धा एकूण गट : 6
1) १ ली व २ री
2) ३ री व ५ वी
3) ६ वी ते ८ वी
4) ९ वी व १० वी
5) ११ वी व १२ वी
6) अध्यापक विद्यालय

व्हिडिओ बनविण्याचा विषय:
भाषा, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र,
शिक्षक प्रशिक्षणाशी निगडी आधुनिक विचार प्रवाह

एकूण बक्षिसे
राज्यस्तरीय प्रथम = 28
राज्यस्तरीय द्वितीय = 28
राज्यस्तरीय तृतीय = 28
एकूण राज्यस्तरीय बक्षिसे = 84

प्रत्येक जिल्हयासाठी 84 बक्षीसे
जिल्हास्तरीय प्रथम = 28
जिल्हास्तरीय द्वितीय = 28
जिल्हास्तरीय तृतीय = 28

प्रत्येक तालुक्यासाठी 84 बक्षिसे
तालुकास्तरीय प्रथम = 28
तालुकास्तरीय द्वितीय = 28
तालुकास्तरीय तृतीय = 28

वरील बक्षिसे मिळवणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींचे पुनश्च एकदा मनःपूर्वक अभिनंदन 🎉
पण आपल्यापैकीच काही मोजके जण आहेत. ज्यांना एकही बक्षीस वाट्याला आले नाही. त्यांना खूप खंत वाटत आहे. तुमच्याही अपयशामध्ये आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. या स्पर्धेमध्ये हार झाली असली तरी आपण आपल्या स्वतःच्या मनाने खचून जाऊ नका. जीवनभराचे यश हे कोणत्याही एका स्पर्धेवर अवलंबून असते. त्यामुळे यश मिळणे व अपयश मिळणे हे दोन्ही जीवनभराच्या यशाच्या पायऱ्या आहेत. भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञ रहा या संदेशाचा अवलंब करावा. म्हणजे सोप्या शब्दात या स्पर्धेत मनासारखे यश मिळाले आहे त्यांनी हुरळून न जाता कृतज्ञता मनात कायम असू द्यावी आणि ज्यांची हार झाली त्यांनीही खचून जाऊ नये. जरी आपली हार झाली असली तरीही पुन्हा आपण किती लवकर आत्मविश्वासाने उभे राहून पुढील स्पर्धेसाठी तयार होतो आणि मोठे यश मिळूनही प्रत्येक वेळेस मीच जिंकेल असे समजल्यास त्याला गर्व म्हणतात आणि गर्वाचे घर खाली झाल्याच्या ऐतिहासिक घटना आपण भरपूर ऐकल्या असतीलच. त्यामुळे माझ्यासहित सर्वांनीच स्थितप्रज्ञ राहून आपले कार्य पुढे सुरू ठेवून आपली कारकीर्द यशस्वी होईलच यासाठी कार्य करत राहूया. मी फक्त स्थितप्रज्ञ या संदेशाची आठवण करून दिली आहे. ज्ञानाचे डोस तुम्हाला देण्याचा माझा उद्देश नाही. पण आपले यश टिकून राहावे यासाठी आठवण करून दिली आहे. कारण यश मिळवण्यापेक्षाही टिकून ठेवणे जास्त कठीण आहे.

नमस्कार🙏
मी श्री. सुभाष बडे
आपलाच तंत्रस्नेही प्रशिक्षक 

शाबास गुरुजी प्लॅटफॉर्मची सुरुवात दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी करण्यात आली. याचा मुख्य उद्देश होता शिक्षणात डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी शिक्षकांना तंत्रस्नेही बनवणे उच्च गुणवत्ता मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञानाचे उच्च दर्जाचे शिक्षण शिक्षकांना देणे. पोर्टल सुरू करण्या अगोदरच शिक्षणात काहीतरी महत्त्वाची कामगिरी करण्याचा उद्देश होता. पण मी जर शिक्षक बनलो तर साधारण वर्गातील शंभर विद्यार्थ्यांना शिकवू शकेल. पण यातून माझ्या मनातली इच्छा पूर्ण होणार नव्हती म्हणून मी असे ठरवले की मी जर शिक्षकांनाच मुलांसाठी अधिक गुणवत्तेचे शिक्षण देण्यास तयार करू शकलो तर…
एक शिक्षक म्हणजे 100 विद्यार्थी असे गणित मी डोळ्यासमोर ठेवले. आणि ठरवले हजारो शिक्षकांना मी जर गुणवत्ता पूर्ण तंत्रज्ञानातील शिक्षण दिले तर लाखो विद्यार्थी अप्रत्यक्षरीत्या घडतील आणि त्यातून माझे मनात ठरवलेले ध्येय पूर्ण होईल. यासाठी शाबास गुरुजी प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. सुरुवातीला प्रशिक्षण मोफत देण्यास सुरुवात केली. कारण त्या वेळेला मी शिक्षकांना किती चांगल्या पद्धतीने घडवू शकेल याची मला स्वतःची परीक्षा घ्यायची होती. माझ्याकडे कोणतेही साधने नव्हती. यामध्येच मला अभिनव आयटी सोल्युशन चे संचालक श्री मुरलीधर भुतडा सर यांच्याशी संपर्क झाला. आमच्या दोघांच्या संयोगातून कोरोनाच्या काळात मोफत तंत्रस्नेही प्रशिक्षण देण्याचे अभियान सुरू केले. प्रशिक्षण माझे – तंत्रज्ञान अभिनव आयटीचे अशी सांगड सुरु झाली. मोफत प्रशिक्षण सुरू असतानाच बऱ्याच प्रशिक्षणार्थींनी मागणी केली की तुमची शिकवण्याची पद्धत आम्हाला आवडली आहे. तुमच्याकडून आणखी ऍडव्हान्स गोष्टी शिकायला आवडतील. तुम्ही विकत प्रशिक्षण घ्यावीत. त्यासाठी आम्ही फिस् द्यायला तयार आहोत. अनेक प्रशिक्षणार्थींच्या आग्रहास्तव मी एक Paid ट्रेनिंग घेण्याचे ठरवले. 15 दिवसाच्या प्रशिक्षणाची पहिली बॅच सुरू केली. कोरोना मध्ये पूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे मी या वेळेला गावाकडे (वारणी) मूळगावी होतो. गावाकडे नेटवर्कची कमतरता होती सोबतच लाईट सुद्धा नसायची आणि माझ्याकडे कॅमेरा सुद्धा नव्हता. मोबाईल अतिशय जुन्या टेक्नॉलॉजीचा होता. तरीही प्रशिक्षणार्थींच्या आग्रहास्तव बॅच घेण्याचे धाडस केले. फक्त एक हेडफोन व जुना मोबाईल आणि मोबाईलच्या नेटवर्क वर बॅच घेण्यास सुरुवात केली. रोज रात्री लाईट नसल्यामुळे चेहरा न दाखवताच फक्त स्क्रीन शेअर करून मी शिकवायला सुरुवात केली. बघता बघता 15 दिवसीय बॅच चेहरा न दाखवताच शेवटला आली. सर्व प्रशिक्षणार्थी माझ्या आवाजाने आणि शिकवण्याच्या कलेने भारावून गेले. मी शिकवलेले प्रत्येक कौशल्य त्यांच्यामध्ये चांगल्या रितीने रुजले होते आणि माझ्या आवाजाचे ते फॅन झाले होते. पंधराव्या दिवशी निरोप समारंभ घेण्याचे ठरवले सर्वांनी अतिशय भावनिक कोर्स बद्दल प्रतिक्रिया दिल्या आणि विनंती केली की सर तुमचा फक्त आवाज ऐकूनच आम्ही एवढे शिकून घेतले आहे. पण तुम्ही आम्हाला शिकवणारे आहेत तरी कोण तुमचा चेहरा आम्ही कधीही पाहिला नाही. 1500 रुपये भरून 15 दिवसाची ट्रेनिंग घेतली पण कोणी शिकवले त्यांचा चेहराच कधी पाहिला नाही याचे दुःख आम्हाला होत आहे. कृपया तुम्ही आम्हाला चेहरा दाखवावा अशी विनंती केली. परंतु त्यांना मी एकदाही कळू दिले नाही की माझ्याकडे रोज संध्याकाळी लाईट नाही. पंधराही दिवस मी त्यांना सांगत होतो की माझ्या चेहऱ्याकडे पाहू नका. मी एवढा सुंदर नाही की जो तुम्हाला फार आवडेल. फक्त माझा आवाज आणि माझी स्क्रीन याच्यावरच तुमचं पूर्ण लक्ष असू द्या. कारण मला तुम्हाला माझा चेहरा दाखवण्यापेक्षा तुमच्यात कौशल्य रुजवणे ही माझी प्राथमिकता आहे. मी पंधराव्या दिवशी पर्यंत तुम्हाला चेहरा दाखवू शकत नाही अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना माझा चेहरा दाखवण्यापासून वंचित ठेवले. पण प्रशिक्षणार्थींचा हट्ट काही सुटत नव्हता आणि तुमचा चेहरा पाहिल्याशिवाय आज कार्यक्रम संपवला जाऊ शकत नाही असा हट्ट धरला नावीलाजास्तव मला देवा समोरचा दिवा लावून माझा अल्प उजेडात चेहरा दाखवून प्रशिक्षणार्थींचे समाधान करून निरोप समारंभ संपन्न झाला. तेव्हा मला कळले की माझी शिकवण्याची कला ही सर्वोत्तम आहे पहिल्याच बॅचमध्ये माझे प्रशिक्षणार्थी खुश झाले होते आणि तिथून पुढे कधीही वळून मागे न पाहता 2 लाखाहून अधिक प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण दिले. शाबास गुरुजी पोर्टलवर आतापर्यंत 40,000 हून अधिक कोर्सेस विकले गेले आहेत. तसेच गुगल आणि मेटा यांच्याकडून ब्लूटिक व्हेरिफिकेशन सुद्धा मिळाले आहेत. तसेच थेट मेटा इंडिया ऑफिस मुंबईमध्ये जाऊन 3 वेळा प्रत्यक्ष मेटा एक्सपर्ट्स कडून व्हाट्सअप ऑटोमेशन व फेसबुक एडव्हर्टाइजमेंट याविषयीचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. हे सर्व यश माझे एकट्याचे नसून माझ्यासोबत असलेले श्री. मुरलीधर भुतडा सर, श्री. हरिनाथ कांबळे सर, माझी सौभाग्यवती स्वाती बडे मॅडम व माझे सर्व प्रशिक्षणार्थी यांचे आहे. या सर्व प्रवासात मी फक्त एक माध्यम आहे व प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आशीर्वाद देणारे सर्व प्रशिक्षणार्थी, सहकारी आणि मित्रमंडळी या सर्वांना हे यश समर्पित करतो.

यापुढेही आतापर्यंतची गुणवत्ता टिकून राहीलच व नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शिकवण्यासाठी शाबास गुरुजी एज्युकेशन प्लॅटफॉर्म कटिबद्ध आहे. मी आतापर्यंत 27 कौशल्य अवगत केली आहेत. त्यातील 22 कौशल्यांमध्ये मी एक्सपर्ट आहे. उरलेले 5 बेसिक व मिडीयम लेवल आहे. अजूनही माझ्याकडे देण्यासाठी खूप काही बाकी आहे. ज्या प्रशिक्षणार्थींनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला सेवा करण्याची संधी दिली त्या सर्व प्रशिक्षणार्थींचे मनःपूर्वक आभार. यापुढेही तुमच्यासारखे तज्ञ, हुशार व जिद्दी, विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याची प्रबळ इच्छा असणारे प्रशिक्षणार्थी मला लाभो. महाराष्ट्रात डिजिटल शैक्षणिक क्रांती घडवताना शाबास गुरुजी पोर्टलचा सिंहाचा वाटा देऊन मोलाचे योगदान करण्याची संधी मिळो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद 🙏

टीम शाबास गुरुजी डॉट कॉम
www.ShabasGuruji.com