आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे देशातील सर्वात महत्त्वाचे दस्तावेज बनले आहेत. इतर ओळखपत्र मिळवण्यासाठी आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जातो. तर पॅन कार्डचा वापर आर्थिक व्यवहार आणि बँकिंग सुविधांसाठी केला जातो. अशा स्थितीत या दोन्ही कागदपत्रांशी संबंधित बनावटीला वेग आला आहे. कारण बरेच लोक इतरांच्या ओळखीवर लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा स्थितीत तुमच्या आधार कार्डमध्ये फसवणूक झाल्याचा संशय आल्यास त्याची चौकशी करून संबंधित कार्यालयात तक्रार नोंदवावी.
तुमचे आधार कार्ड इतर कोणीतरी त्यांच्या बँक खात्यात किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेत वापरत असतील तर भविष्यात तुमच्यासमोर एखादं मोठं संकट येऊ शकतं. तुमचं आधार कार्ड कुणी वापरत आहे का? हे कसे तपासावे यांची संपूर्ण माहीत वाचून घ्यावी..
UIDAI ने एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे ज्यावरून तुमचं आधार कार्ड कुठे कुठे वापरले जात आहे, हे कळु शकतं. तुमचं आधार कार्ड कुठे वापरलं जात आहे, हे तुम्ही तपासू शकता.
आधार कार्डची हिस्ट्री कशी तपासायची ?
आधार कार्डची हिस्ट्री तपासण्यासाठी सर्वप्रथम आधार कार्ड uidai.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा.
1) यानंतर My Aadhaar च्या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर
2) Aadhar Services पर्यायाखाली आधार Aadhaar Authentication History वर क्लिक करा.
3) यानंतर तुमच्या समोर एक विंडो उघडेल ज्यामध्ये 12 अंकी आधार क्रमांक टाका.
4) Security code म्हणजेच Captcha भरावा. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा.
त्यानंतर OTP टाका.
5) यानंतर ज्या तारखेदरम्यानची History शोधायची असेल त्या तारखा select करा.. आणि submit करा..
यानंतर आधारचा Link History तुमच्यासमोर ओपन होईल आणि नंतर डाउनलोड करा.
कोणत्याही चुकीच्या व्यक्तीने तुमचा आधार वापरला असेल तर त्याची त्वरित तक्रार करा.
आधार हा एक अतिशय महत्त्वाचा कागदपत्र आहे हे लक्षात ठेवा, त्यामुळे त्याचा इतिहास वेळोवेळी तपासत राहा.
आधार link History बद्दलची माहीत तुम्हाला कशी वाटली ते comment मध्ये जरूर लिहा…
#Technology Updates