fbpx
Select Page

शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार 🙏
आपण नेहमीच विद्यार्थ्यांच्या अभ्यासात रुची वाढावी व आकलन करताना विद्यार्थ्याची कमीत कमी ऊर्जा खर्च व्हावी यासाठी प्रयत्नशील असतो. बरेच शिक्षक अनेक वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करून पाहत असतात. एकंदरीत प्रयोगातून हेच लक्षात येते की मुलांना हसत खेळत शिकणे हे सर्वात जास्त सोपी आणि सोयीस्कर वाटते. कोरोना नंतर तंत्रस्नेही शिक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारचे ई-कॉन्टेन्ट तयार करून शिकण्याच्या पद्धतीत बदल केला. यामध्ये प्रामुख्याने कार्टून व्हिडिओ, पीपीटी व्हिडिओ, व्हाईट बोर्ड/ब्लॅक बोर्ड ॲनिमेशन व्हिडिओ, ऑगमेन्टेड रियालिटी व्हिडिओ, तसेच काही ऑनलाईन क्विझ, इंटरॅक्टिव्ह पीडीएफ अशा वेगवेगळ्या साहित्यांचा वापर केला. पण यामध्ये व्हिडिओ बनवण्यात शिक्षकांचे सर्वात जास्त वेळ व ऊर्जा खर्च होते. यावर आणखी एक उपाय मी तुम्हाला येथे सांगत आहे तो तुम्ही जरूर शिकून घ्यावा आणि वापरावा असा सल्ला मी तुम्हाला देतो…
मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून व्यक्तीने स्वतः अनुभवातून शिकणे हे अधिक रुचिकारक व दीर्घकालीन संकल्पना स्पष्ट होण्याचे साधन आहे असे मानले जाते. यासाठी Learn with Fun interactive e-content creation ही संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. या कॉन्टेन्टचा मुख्य उद्देश असतो शिकवलेला भाग मुलांना प्रत्यक्ष कृती करून सराव करण्याची संधी देणे. याला *Gamified Learning* सुद्धा म्हणतात.
यामध्ये खालील प्रकारच्या टॉपिकचा समावेश होऊ शकतो.
उदा.:
• जोड्या लावा गेम
• फ्लॅश कार्ड गेम
• स्पीकिंग कार्ड्स गेम
• फाईंड द मॅच गेम
• स्पिन द व्हील गेम
• ओपन द बॉक्स गेम
• अनाग्राम गेम
• कम्प्लिट द सेन्टेन्स गेम
• नकाशातील स्थान ओळखा गेम
• शब्द शोधा गेम
• क्रॉस वर्ड गेम
• हँग मॅन गेम
• फ्लिपकार्ड गेम
• आणखी बरेच रंजक गेम तयार करून मुलांना हसत खेळत सराव करण्याच्या विविध पद्धती समजणार आहेत…

वरील टॉपिक शिकल्याने आपण पीपीटी आणि व्हिडिओ पेक्षा ही वेगळ्या पद्धतीने मुलांना डिजिटल खेळातून शिक्षण देण्याच्या विविध पद्धतीने मुलांची शिक्षणातील रुची व आकलन क्षमता वाढवू शकतो. हे जर प्रत्यक्ष तुम्हाला Live ट्रेनिंग द्वारे मोफत शिकायचे असेल तर यासाठी खाली दिलेल्या बटन वर व्हॉटस्अप ग्रुप जॉइन करु शकता 👇

Learn with Fun interactive e-content creation ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली ते comment मध्ये जरुर सांगा…